Breaking News

महिलेची रिलायन्स अधिकार्याविरोधात तक्रार

नागोठणे ः प्रतिनिधी – विभागातील शिहू येथील लीलाबाई पाटील यांच्या शेतातून येथील रिलायन्स कंपनीची सांडपाणी वाहून नेण्यासाठीची पाइपलाइन टाकण्यात आली. ती फुटल्यामुळे तिची दुरुस्ती करण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पाटील यांनी या दुरुस्तीला हरकत घेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी द्या व मगच दुरुस्ती करा, असे सांगितले. यावर रिलायन्सच्या एका अधिकार्‍याने तक्रारदार महिला व त्यांचा मुलगा रवींद्र यांना शेतावर बोलावून मुलासमोरच मला दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली, असे पाटील यांचे म्हणणे आहे. याबाबत महिलेने अधिकार्‍याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

त्यानुसार रिलायन्सच्या अधिकार्‍याविरोधात शनिवारी (दि. 19) अदखलपात्र तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, महिलांनी आंबेघर येथील लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या कार्यालय परिसरात जमून समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांच्याशी याबाबत चर्चा केली. या महिलांनी संबंधित अधिकार्‍याविरोधात पोलीस ठाण्यात एकत्र जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यापूर्वी रोह्याचे उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नागोठणे पोलिसांसह त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली व या महिलांना मोर्चा काढण्यापासून परावृत्त केले होते. त्यामुळे दोन-चार महिलांनी शनिवारी नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली, असे लोकशासन समितीचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply