Breaking News

सेवा सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण

खोपोली ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत दि.14 ते 23 सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवारी (दि. 20) गगनगिरीनगर, प्रकाशनगर, दत्त मंदिर, लवजी श्रीराम मंदिर परिसर येथे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, शहर महिला अध्यक्ष शोभा काटे, जिल्हा महिला चिटणीस स्नेहल सावंत, ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख, शहर उपाध्यक्ष चंद्रप्पा अनिर्वार, दिलीप पवार, चिटणीस गोपाळ बावस्कर, प्रमोद पिंगळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंदुलकर, सरचिटणीस विनायक माडपे, महिला जिल्हा कोषाध्यक्ष रसिका शेटे, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमती महर्षी, कार्यकर्ते अनिल करणूक, संजय म्हात्रे, प्रमोद वाघ, गणेश ठाकरे, अक्षय षण्मुगम, सागर काटे, अनिल अनिवार, संतोष चौधरी, सिद्धेश पाटील आदी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Check Also

फिल्मी गॉसिप्सची चव गेली, अळणी वाटू लागलंय….

शर्मिला टागोरने शैलीदार फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मन्सूर अली खान पतौडीची विकेट कशी काढली आणि …

Leave a Reply