Breaking News

बास्केटबॉलमध्ये कारमेल स्कूलची बाजी

अलिबाग : रामप्रहर वृत्त

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा नुकतीच खोपोली येथील कारमेल स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत यजमान संघाने बाजी मारली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून विविध गटांत 35 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिओनी, डॉ. नलिन शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी सचिन निकम उपस्थित होते. स्पर्धेचे शिस्तबद्ध आयोजन समन्वयक व शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे यांनी केले होते, तर समीर शिंदे, जयश्री नेमाने तसेच आयप्पन यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेची वैशिष्ट्ये म्हणजे कारमेल स्कूलचे चारही संघ अंतिम फेरीत दाखल झाले होते. त्यापैकी 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलींचे संघ प्रथम आले असून, त्यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर 14 व 17 वर्षे मुलांचे संघ उपविजेते ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या लोकल मॅनेजर सिस्टर लिली पॉल, मुख्याध्यापिका सिस्टर लियोनी तसेच सिस्टर क्लियरस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply