Breaking News

नवी मुंबईत दोन लाख कोविड चाचण्या पूर्ण

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत गुरुवारी (दि. 1) अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची वाढवलेल्या क्षमतेने नवी मुंबईत दोन लाख कोविड चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दिवसभरात 383 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे नवी मुंबईत बधितांची संख्या 37 हजार 056 तर 332 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 32 हजार 657 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 88 टक्क्यांवर स्थिरावला आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 645 रुग्ण उपचार घेत आहेत.  दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 754 झाली आहे. नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून दिवसभरात दोन हजार 484 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून,  रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या एक लाख 24 हजार 750 झाली आहे. एकूण आर.टी. पी. सी.आर टेस्ट केलेल्यांची संख्या 76 हजार 642 झाली आहे. अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची वाढवलेल्या क्षमतेने नवी मुंबईत 2 लाख कोविड चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण संख्या दोन लाख एक हजार 392 इतकी झाली आहे. पालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली असून त्याद्वारे शहरात 720 पथकांकडून डोअर टू डोअर मोहीम राबवली जात आहे. मुख्य म्हणजे पालिकेने नेरुळ येथील माता व बाल रुग्णालयात कोविड लॅब उभारल्यामुळे चाचण्यांचा वेग वाढून पालिकेचा खर्च वाचला असून, विकेट अहवाल प्राप्त होत आहे. त्याशिवाय पालिकेने शहरातील नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी भरारी पथके नेमली असून त्याद्वारे नागरिकांना दंड आकारून शिस्त लावली जात असून, सुरुवातीच्या काळात कोरोनाचे केंद्र बनलेल्या एपीएमसीमध्ये देखील आयुक्तांनी स्वतः भेट देत कडक पाऊले उचलण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. गुरुवारची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 50, नेरुळ 72,वाशी 52, तुर्भे 53 कोपरखैरणे 49, घणसोली 36, ऐरोली 64 दिघा सात, अशी होती.

दिलासादायक! मृत्यूदरात घट

अँटिजेन टेस्टच्या अहवालाबाबत साशंकता असली तरी प्राथमिक लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊज त्यांच्यावर वेळेत उपचार होत आहेत. त्यामुळे मृत्यूदारात देखील कमी झाला आहे. सुरुवातीला 3.25 टक्क्यांच्या पुढे असलेला मृत्युदर सध्या  2.03 टक्के इतका खाली आला असून ही समाधानाची बाब मानली जात आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply