Breaking News

कोरोना : राजभवनाचे सॅनिटायझेशन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना राजभवनातील जवळपास 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर राजभवन व आसपासच्या परिसरात सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) करण्यात आले आहे.

राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचार्‍यांची मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा एकदा चाचणी करण्यात

आली आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाची लक्षणेदेखील आपल्यात दिसून आली नाहीत. कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मी आवश्यक ती खबरदारी घेत आहे. त्यामुळे माझ्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार असून, आपली तब्येत चांगली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘ते’ वृत्त चुकीचे

राजभवनातील काही कर्मचार्‍यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती देत आपण

स्वतःला क्वारंटाइन केले नसल्याचे म्हटले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply