पाली ः प्रतिनिधी
कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असून, नव्या वर्षात तरकोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे हंगामी व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. यंदा होळी व धूलिवंदनवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी रंग, पिचकारी आदी विकणार्या व्यावसायिकांचा बेरंग झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेकांनी रंग व पिचकार्या खरेदीसाठी आपला हात आखडता केला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे चिनी मालाला भारतीय बाजारपेठेतून मागणी नव्हतीच, मात्र भारतीय बनावटीचा मालदेखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विकला जात नाही आहेए. परिणामी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेकांनी रंग व पिचकार्या खरेदीसाठी आपला हात आखडता केला आहे. कोरोनामुळे यंदा धुलीवंदन खेळणार नसल्याचे नागोठणे येथील पियुष सोनावणे या मुलाने सांगितले. कोरोनाच्या दहशतीमुळे चिनी मालाला भारतीय बाजारपेठेतून मागणी नव्हतीच. मात्र भारतीय बनावटीच्या मालदेखील कोरोनाच्या दहशतीने विकला जात नाही आहे. परिणामी व्यवसाईकांचे प्रचंड नुकसान झाले. यंदा मागील वर्षीचाच माल विक्रीसाठी ठेवला आहे, असे पालीतील एका विक्रेत्याने सांगितले. मागील वर्षी होळी आणि धूळवडसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या होत्या. विविध दुकानांमध्ये रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकार्या आदी लाखो रुपयांचा माल दुकानदारांनी भरून ठेवला होता. इकोफ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक व सुक्या रंगाना जास्त पसंती असल्याने तोही माल दुकानात मुबलक होता. गेल्या वर्षी कोरोनाचा भारतात तोवर तेवढा शिरकाव झालेला नसल्याने हे सण साजरे झाले आणि व्यावसायिकांनाही दोन पैसे मिळाले, मात्र यंदा कोरोनामुळे मागील वर्षीच्या तुलनेत पिचकारी व रंगाची विक्री अवघ्या 10 ते 20 टक्क्यांवर आली आहे. परिणामी व्यापारी व व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
यंदा घाऊक बाजारात रंग, पिचकार्या व इतर सामग्रीच्या किमती उतरल्या असल्या तरी नवीन माल आणला नाही. कोरोनासंदर्भात खबरदारी घेत फक्त सुके रंग विक्रीसाठी ठेवणार आहे.
-निलेश गुप्ता, व्यावसाईक, पाली