Breaking News

विहिंपचे व्यंकटेश आबदेव यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी

पुण्यातील कात्रज येथील विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांची सोमवारी (दि. 27) रात्री साडेदहा वाजता पुण्यातील राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी पाच वाजता नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आबदेव हे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पूर्ण वेळ काम करीत होते. सध्या ते पुण्यात कात्रज येथील गुजरवाडी येथे मुलाकडे राहत होते. ते मूळचे मुरूड-जंजिरा येथील होते. 10 दिवसांपूर्वी आबदेव आजारी पडल्याने त्यांना राव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील 30 वर्षांपासून ते विश्व हिंदू परिषदेचे काम करीत होते. त्यामुळे ते दिल्लीत वास्तव्याला होते. दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यातून बरे झाल्यावर त्यांना पुण्यातील घरी आणण्यात आले होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply