मिलान : वृत्तसंस्था
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला उदयोन्मुख युवा फुटबॉलपटू मोइस कीन याने एक गोल लगावत युव्हेंटसला एम्पोलीविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे सेरी ए लीगच्या गुणतालिकेमध्ये युव्हेंटसला 18 गुणांची आघाडी मिळाली आहे.
युव्हेंटसने एम्पोलीविरुद्धच्या सामन्यात कीनला प्रारंभी उतरवले नव्हते, मात्र मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे उत्तरार्धात कीनला बदली खेळाडू म्हणून उतरवण्यात आले. त्याने सामन्याच्या 71व्या मिनिटाला गोल करीत युव्हेंटसला एम्पोलीविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून दिला. त्यामुळे सेरी ए लीगमध्ये युव्हेंटसला गुणांची मोठी आघाडी मिळाली आहे.