रेवदंडा : प्रतिनिधी
जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडा आयोजित कबड्डी स्पर्धेत दर्यावर्दी नागाव संघाने विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक शिवछत्रपती भाल, तृतीय क्रमांक साईनाथ शिरगाव, तर चतुर्थ क्रमांक शितळादेवी चौल या संघाने पटकाविला. रेवदंडा हरेश्वर मैदानात शनिवारी (दि. 30) 16 निमंत्रित संघांमध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा शुभारंभ रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुभाष चिटणीस, शिक्षक आर. डी. नाईक, किशोर राठोड, मुख्याध्यापक आडसरे सर, सूर्यकांत पाटील आदींची उपस्थिती होती. रेवदंडा येथील माजी क्रीडा शिक्षक दीपक मोकल यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल कबड्डी स्पर्धेचे आयोजन इस्माईल कासकर, गणेश कोसेकर, तन्मय मोकल, इलान वासकर आणि जय मल्हार मित्रमंडळ थेरोंडा यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित दीपक मोकल यांचा सत्कार प्रमुख पाहुणे रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड भूषण दीपक मोकल, सूर्यकांत पाटील, सुशांत भोईर, नीलेश खोत व संदीप भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.