पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी (दि. 16) सायंकाळी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत जवळपास सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू झाले असताना देव मात्र मंदिरात बंदिस्त होते. त्यामुळे भाजप तसेच विविध संघटनांनी मंदिरे खुली करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर राज्यातील धार्मिक स्थळे सोमवारपासून खुली झाली. याचा आनंद साजरा करण्यासाठी पनवेलमधील विरुपाक्ष मंदिरात सोमवारी महाआरती आयोजित करण्यात आली होती. या महाआरतीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, संदीप लोंढे यांच्यासह मंदिराचे विश्वस्त व भाविक उपस्थित होते.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …