मुंबई : प्रतिनिधी
मैत्रिणीला साखरपुड्याच्या पार्टीसाठी म्हणून बोलवून तिच्यावर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये मागच्या आठवड्यात हा संतापजनक प्रकार घडला.
पीडित तरुणीने 15 नोव्हेंबरला तीन आरोपींविरोधात तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी मला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आरोपींनी माझ्यावर बलात्कार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तीन आरोपींपैकी एकाने त्याच्या साखरपुड्याच्या निमित्ताने 8 नोव्हेंबरला ही पार्टी आयोजित केली होती, असे तपास करणार्या पोलिसांनी सांगितले.
पीडितेच्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपीने तिला दारू पिण्यासाठी जबरदस्ती केली. पार्टीला आलेल्या अन्य दोन मैत्रिणी थोड्या वेळाने तिथून निघून गेल्या, पण मुख्य आरोपी आणि दोन मित्र तिथेच थांबले होते. त्यांनी हॉटेलमधील खोलीत बलात्कार केला. पीडिता घरी पोहोचल्यानंतर तिने लगेच याबद्दल कुटुंबीयांना काही सांगितले नाही, पण अखेर तिने हिंमत करून कुटुंबीयांना तिच्यासोबत काय घडले ते सांगितले. या प्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …