Breaking News

किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त

दीपावलीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

या कार्यक्रमास नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चाचे उत्तर जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, चिटणीस कोमल पाटील, सदस्य अथर्व गुजरे, अनिकेत भोईर आदी उपस्थित होते.

या किल्ल्यांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः पाहणी करून स्पर्धकांचे कौतुक केले. उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक संग्राम गड (राजे शिवराय प्रतिष्ठान), द्वितीय क्रमांक जंजिरा (पार्थ माळी आणि टीम), तृतीय क्रमांक खांदेरी (बाल मित्र मंडळ), तर उत्तेजनार्थ क्रमांक राजगड (साईराज चौधरी आणि टीम) आणि सिंधुदुर्ग (कट्टा कुटुंब) यांनी पटकाविला. सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply