Breaking News

पेणमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ

पेण : प्रतिनिधी

गेल्या आठवडाभर पेण तालुक्यात दररोज एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र शुक्रवारी (दि. 20) थेट 14 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भितीचे वातावरण दिसून येऊ लागले आहे.

कोरोना पुर्ण नष्ट झालेला नसतानाही दिवाळीच्या तीन  दिवस अगोदर पेण शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी झालेली दिसून येत होती. या गर्दीत काहींनी नावापुरते मास्क वापरले होते. मागील आठवड्यात दररोज एक ते दोन तर कधी शुन्य कोरोना रुग्णही आढळले होते. यामुळे बर्‍याच जणांनी कोरोना संपला असल्याचे गृहीत धरुन एकमेकांच्या घरी जाणे-येणे तसेच पर्यटन व पार्टी स्थळी बिनधास्तपणे फिरणे, बोलणे याला पसंती दिली होती. त्याचे प्रतिकूल परिणाम दिवाळी सणानंतर दिसू लागले आहेत. मास्कचा वापर करा, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवा अशा सूचना शासनाच्या वतीने वारंवार देण्यात येत असूनसुध्दा दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते हे वाढलेल्या रुग्ण संख्येवरून दिसून येत आहे.

 पेण तालुक्यात आतापर्यंत एकूण तीन हजार 948 कोरोना रुग्ण आढळले असून, त्यापैकी तीन हजार 796 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 103 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या पेणमधील अँक्टिव्ह रुग्णसंख्या 49 असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने  देण्यात आली. दरम्यान, दिवाळी सणानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढतो की काय, अशी भीती पेणमधील सामान्य नागरिकांना सतावू आहे.

Check Also

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या …

Leave a Reply