Breaking News

माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते कळले होते, पण..

लता मंगेशकर यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. 1963मध्ये लता मंगेशकर हे नाव सर्वश्रुत झाले होते. त्यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हा विषप्रयोग कुणी केला हे मला कळले होते, पण माझ्याकडे पुरावा नव्हता, असे आता लता मंगेशकर यांनी म्हटले आहे. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.
लतादीदींनी सांगितले की, ही खूप जुनी गोष्ट आहे. त्या वेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी खूप आजारी झाले होते. मी थोडेथोडके नाही जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. तेव्हा अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत, मात्र त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरने मला हे सांगितले नव्हते की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला बरे केले. मला भयंकर अशक्तपणा आला होता. मी भविष्यात चालू शकेन की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. तीन महिने माझे गाणेही बंद होते.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply