पोलादपूरमध्ये महिलाराज
पोलादपूर :पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. याखेरिज पाच सर्वसाधारण आणि तीन मागास व अनुसूचित जाती या उर्वरित आठ जागांवरही महिलांना पुरुष उमेदवारांविरुद्ध उमेदवारी करण्याची संधी शक्य असल्याने आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महिलाराज दिसून येणार आहे. पोलादपूरमधील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार दिप्ती देसाई आणि मुख्याधिकारी विराज लबडे यांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग 1 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 : अनारक्षित सर्वसाधारण, प्रभाग : अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग 4 : मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 5 : अनारक्षित सर्वसाधारण, प्रभाग 6 : मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग 7 : मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 8 : मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग 9 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 11 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 12 : मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 13 : अनारक्षित सर्वसाधारण, प्रभाग 14 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 15 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 16 : अनारक्षित सर्वसाधारण, प्रभाग : 17 अनारक्षित सर्वसाधारण.
खालापुरात नगराध्यक्षांना प्रभाग बदलावा लागणार
खालापूर नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये काही विद्यमान नगर नगरसेवकांना घरी बसावे लागणार असून, काहींना लॉटरी लागल्याचे चित्र आहे, तर विद्यमान नगराध्यक्ष दिलीप पवार यांचा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांना आपला प्रभाग आता बदलावा लागणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग 1 : अनुसूचित जाती, प्रभाग 2 : नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 3 : सर्वसाधारण, प्रभाग 4 : अनुसूचित जाती जमाती महिला, प्रभाग 5 : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 6 : नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग 7 : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 8 : अनुसूचित जमाती, प्रभाग 9 : अनुसूचित जमाती महिला, प्रभाग 10 : अनुसूचित जमाती महिला, प्रभाग 11 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 12 : सर्वसाधारण महिला, प्रभाग 13 अ : अनुसूचित जमाती, प्रभाग 14 : सर्वसाधारण, प्रभाग 15 : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 16 : सर्वसाधारण, प्रभाग 17 : अनुसूचित जमाती महिला.