Breaking News

ओबीसी समन्वय समितीकडून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

कर्जत : बातमीदार
‘ओबीसी संघर्षवारी, आमदारांच्या दारी‘ या उपक्रमांतर्गत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि तहसीलदारांना ओबीसींच्या जणगणना व आरक्षण अशा विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देण्यात आली. या वेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जातींच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत तालुका आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव, नाभिक समाज अध्यक्ष दिलीप शिंदे, साळी समाजाचे हावरे, वंजारी समाजाचे भास्कर थोरवे, लोहार समाजाचे जे. एन. जोशी, धनगर समाजाचे रामदास कोकरे, प्रभू विश्वकर्मा समाजाचे संजय मालगुंडकर, समता परिषदेचे कैलाश पोटे यांच्यासह इतिहास संशोधक वसंत कोळंबे, शिवराम महाराज तुपे, भगवान धुळे, विजय कोंडिलकर, रोहिदास लोभी, मनिषा दळवी, देविदास कोळंबे, श्रीराम पाटील, रवींद्र सोनावणे, दिलीप शेळके, चेतन चिखलकर, प्रसाद डेरवणकर, संतोष मालगुंडकर, भास्कर थोरवे, संजय पांचाल आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply