पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील नव्हेच तर राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी पर्यंत संपन्न होणार असून त्यासाठी रामशेठ ठाकूर क्रीडा नगरी
सज्ज झाली आहे.
खेळ आणि कबड्डीच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी तन, मन, धनाने चालना दिली आहे. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धा अनेकवेळा आयोजित करून राज्यात आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केले आहे. त्याचबरोबर पनवेल आणि रायगडचे नाव उच्च स्तरावर पोहचविले आहे. या रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धेच्या अनुषंगाने सुसज्ज अशी चार क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधांचीही तयारी पूर्ण झाली आहे.
या क्रीडांगणावर जवळपास 3500 खेळाडू आपले कसब दाखवणार आहेत. यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा पुरुष आणि महिला संघ निवड होणार आहे. हि स्पर्धा उत्तम प्रकारे होण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समिती सचिव व राष्ट्रीय प्रशिक्षक शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर आदी पदाधिकारी विशेषत्वाने लक्ष देत आहेत. त्या अनुषंगाने स्पर्धेसाठी क्रीडानगरी सज्ज झाली आहे.
Check Also
महाराष्ट्रात प्रथमच ‘स्मार्ट पे किऑस्क’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा
पनवेल महापालिकेचा पुढाकार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper