मोहोपाडा : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत ’आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी वासांबे मोहोपाडा शहरातील मरिआई मंदिराजवळ असणार्या रास्त भाव धान्य दुकानातून नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली आहे. मोहोपाड्यातील स्थानिकांच्या हस्ते शुभारंभ करुन रास्त भाव धान्य दुकानाचे अनंता पाटील यांच्या हस्ते नागरिकांना आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना केवळ 100 रुपयात एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर तसेच एक लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशानुसार वासांबे मोहोपाडा रास्त भाव धान्य दुकान नंबर 1 याचे अनंता पाटील यांनी आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात केली आहे. आनंदाचा शिधा घेण्यासाठी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …