Breaking News

रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू; रविवारी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

अलिबाग : प्रतिनिधी

करोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनानेदेखील हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. करोना विषयक नियमांचे उल्लघन करणार्‍या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. रविवारी (दि. 27) जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा नविन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभुमीवर मुंबईसह सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना विषाणूचा नवा प्रकार, नाताळ सण आणि नववर्ष स्वागताचा संभाव्य जल्लोष या बाबींचा विचार करून राज्यातील महानगरांमध्ये मंगळवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय निर्णय घ्या, असे आदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांडवा, किहीम, अलिबाग, नागाव, आक्षी, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर आणि माथेरान हजारो पर्यटकांनी गजबजत आहे. इथे येणारे पर्यटक हे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महानगरातील आहेत. 25 ते 27 डिसेंबर अशी सलग ती दिवस सुट्टी आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यावर येतात. त्यामुळे खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातदेखील रात्रीची संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे. मुरुडजवळील जंजिरा किल्ला पाहणासाठी मोठ्या संख्येनी पर्यटक येत आहेत. परिणामी तेथील गर्दीचे नियोजन करणे कठिण जात आहे. त्यामुळे येत्या रविवारी (दि. 27) जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात  येणार आहे.

रायगड जिल्ह्यात येण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र पर्यटन व्यवसायांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. करोना नियमांचे उल्लघन करणार्‍या रिसॉर्ट, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई केली जाणार आहे. -निधी चौधरी, जिल्हाधिकारी

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply