Breaking News

‌‘इच्छांचे दीप प्रवाही‌’ पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त
डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दाम्पत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सेवावाटचालीचा सविस्तर आणि प्रेरणादायी आढावा घेणारे ‌‘इच्छांचे दीप प्रवाही‌’ या संग्राह्य पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.११) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते झाले. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर प्रसिद्ध ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद डॉ. सुहास हळदीपुरकर, धूतपापेश्वर कंपनी लि.चे सीईओ रणजीत पुराणिक, कुलाबा जिल्हा संघचालक संतोष सुतार, रुग्णालय कार्यकारिणीच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती समुद्र, पुस्तकाचे लेखक सुधीर जोगळेकर आदी उपस्थित होते.
‌‘इच्छांचे दीप प्रवाही‌’ हे पुस्तक डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक सेवाकार्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारे आहे. या पुस्तकात त्यांच्या कार्याची सुरुवात, समाजासाठी केलेले विविध उपक्रम, रुग्णसेवेला दिलेले प्राधान्य तसेच रुग्णालयाच्या उभारणीपासून विस्तारापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे सुलभ आणि ओघवत्या भाषेत मांडण्यात आले आहेत. यावेळी पटवर्धन रुग्णालयाच्या अधिकृत वेबसाईटचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच पटवर्धन रुग्णालयाच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. नितीन दांडेकर, डॉ. दीपक पुरोहित, डॉ. रवींद्र इनामदार, ॲड. सुजाता चव्हाण, उदय टिळक, सुलक्षणा टिळक, दादा जोशी, उर्मिला जैन या मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी हे पुस्तक वैद्यकीय, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रातील कार्यकर्ते, तरुण पिढी तसेच सर्वसामान्य वाचकांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, महापौर नितीन पाटील, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, नगरसेवक अजय बहिरा, गणेश कडू, तेजस कांडपिळे, सुमित झुंझारराव, नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, कामगार नेते रवी नाईक, राजीव समेळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply