Breaking News

रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्या आस्थापनांवर होणार कारवाई; पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची माहिती

पनवेल : वार्ताहर

शासनाने निर्देश आखून दिले असताना सुद्धा अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपर्‍या व इतर आस्थापने सुरू असतात. यांच्याविरोधात आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात अनेेकजण तयारी करीत आहेत. काहीजण यासाठी हॉटेल, ढाबे, फार्म हाऊस, सोसायटीचे टेरेस याठिकाणी नियोजन करीत आहेत. अशावेळी मद्यासह गुटखा, अमली पदार्थ, गांजा आदींचा सर्रास वापर केला जातो. काही ठिकाणी रेव्ह पाटर्यांचे आयोजन करण्याात येते. हे सर्व टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्या परिसरात असणारे हॉटेल, ढाबे व इतर आस्थापने यांची माहिती घेण्यात येत आहे. कोणताही अनुचित किंवा गैरप्रकार घडू नये यासाठी सर्वच पोलीस ठाण्याची तयारी सुरू केली आहे. 31 डिसेंबरला महत्त्वाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडतात. त्यांनी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःवर नियंत्रण ठेवावे, गर्दीचे ठिकाण टाळावे, हॉटेल, पाटर्या, ढाबे पाटर्या टाळाव्यात, असे आवाहन परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले आहे. तसेच नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याची माहिती सुद्धा शिवराज पाटील यांनी दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या आस्थापना, सार्वजनिक ठिकाणी विरंगुळ्यासाठी फिरण्यावर बंदी, इमारतीच्या वा सोसायटीच्या गच्चीवर साजर्‍या होणार्‍या सर्व कार्यक्रमांना बंदी, धार्मिक उत्सव, अन्य कार्यक्रमांसाठी पोलिसांची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.

खासगी सांस्कृतिक कार्यक्रमांवरही निर्बंध

नवी मुंबई : संचारबंदी काळात सोसायटी आवार वा इमारतीवर खासगी सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदीसह अनेक निर्बंध लागू करण्यात आल्याचे परिपत्रक विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून सहपोलीस आयुक्त जय जाधव यांनी जारी केले आहे. नियमनाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विनाकामी फिरणार्‍यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply