कामोठे ः रामप्रहर वृत्त
शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135व्या जयंत्तीनिमित्त संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयामध्ये कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जयंत्तीचा कार्यक्रम मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विद्यालयाचे चेअरमन तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अण्णांची विचारधारा जोपासावी असे मत रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कार्यक्रमावेळी व्यक्त केले, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत कलागुणांचा विकास करावा, असा सल्ला दिला. या वेळी विद्यार्थ्यांनी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचा जीवनपट मांडणारा नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या जयंत्तीच्या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, भाजप कामोठे अध्यक्ष रवी जोशी, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली चव्हाण, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापीका अर्चना खाडे-चव्हाण, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, भाजप नेते प्रदिप भगत, भाऊसाहेब थोरात, आशा भगत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब कारंडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि रयत सेवक उपस्थित होते.