पनवेल : रामप्रहर वृत्त
बामणडोंगरी गावातील वाघ धोंड आळी येथे गावातील पाण्याच्या पाच हजार लीटरच्या दोन प्लास्टिक सिंटेक्सच्या टाक्यांचे रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या आहेत. नुकसान करणार्या अज्ञातव्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील बामणडोंगरी गावामध्ये वाघ धोंड अळी 50 ते 60 लोकवस्ती आहे. या भागातील लोकांना बरेच महिने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असायचे. त्यामुळे ग्रामपंचायत निधीतून या गावासाठी पंप हाऊस आणि पाच हजार लीटरच्या दोन प्लास्टिक सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या होत्या. या टाक्या रविवारी मध्यरात्री कोणा अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करून फोडल्या आहेत. यात टाक्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत बामणडोंगरी गावाचे उपसरंपच अमर म्हात्रे यांनी तत्काळ या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.