Breaking News

सिराजचा ऑस्ट्रेलियाला ‘पंच’; भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था

मोहम्मद सिराजचे पाच बळी आणि चार गडी बाद करून शार्दुल ठाकूरने दिलेली तोलामोलाची साथ या जोरावर भारताने ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाला 294 धावांपर्यंत रोखले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला 328 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना थांबवण्यापूर्वी दुसर्‍या डावात भारताने नाबाद चार धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 324 धावांनी पिछाडीवर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने, तर दुसर्‍या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला होता. अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply