Breaking News

खोपोलीमध्ये भरला आठवडा बाजार

खोपोली : प्रतिनिधी

अनेक वर्षापासून खोपोलीत बाजारपेठेतील रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार लॉकडाउननंतर प्रथमच गुरुवारी (दि. 21) फुललेला पहावयास मिळाला. खालापूर जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खोपोली शहर हे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले ठिकाण आहे. खालापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ गृहोपयोगी व शेती विषयक सामान खरेदीसाठी खोपोलीत येत असतात. ग्रामस्थांच्या मागणीनुसार खोपोलीत गुरुवारी साप्ताहिक बाजार भरतो, या बाजारात खेड्यापाड्यातील शेतकरी व विशेषत: महिला मोठ्या प्रमाणात येत असतात, साप्ताहिक बाजारमुळे येथील दुकानातील व्यापारांचाही व्यवसाय होत असतो. लॉकडाउनमध्ये हा बाजार बंद करण्यात आला होता. कोविडची तीव्रता कमी झाल्यानंतर नगरपालीकेने साप्ताहिक बाजाराला परवानगी दिली. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यात व्यापार्‍यांनी दुकाने भरली मात्र पाहिजे तसा व्यवसाय झाला नसल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले. किमान आज तरी आठवडा बाजारातून व्यवसाय होईल, अशी अनेक व्यापार्‍यांनी आशा व्यक्त केली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply