Breaking News

सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर; चेंढरेचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील 62ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 21) काढण्यात आली. त्यात 31 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अलिबाग शहराच्या वेशीवर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी तर वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मन तर्फे झिराड ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे. 

अलिबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोडतीमध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. मीरा संदिप पाडगे (वय 9) हिच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या उचलण्यात आल्या. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह सर्वपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 2011 च्या जनगणनेचा विचार करून हे  आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणांमुळे अनेकांचे पत्ते आपोआप कट झाले आहेत.

प्रवर्ग                     ग्रामपंचायत

अनुसूचित जाती खुला        :   चेंढरे 

अनुसूचित जमाती खुला       :  खानाव, आगरसुरे, कोप्रोली, खिडकी, वडगाव, ताडवागळे,

अनुसूचित जमाती महिला    :  बेलोशी, थळ, कुर्डुस, नवेदर नवगाव, कुरकोंडी कोलटेंभी,

नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला : वरंडे, रेवदंडा, बोरघर, झिराड, मापगाव, रेवस, चरी, आंबेपुर

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला     :  वरसोली, नागाव, रामराज, कामार्ले, चिंचवली, माणकुळे, मान तर्फे झिराड,

                                   श्रीगाव, पोयनाड

सर्वसाधारण खुला            : ढवर, बामणगाव, चौल, चिंचोटी, सुडकोली,सातिर्जे, रांजणखार डावली, सासवणे,

                         किहीम, खंडाळे, नारंगी, वेश्वी, परहूर, वाघ्रण, शिरवली, वाघोडे, कुसूंबळे   

सर्वसाधारण महिला     : बेलकडे, कुरुळ, आक्षी, सहाण, कावीर, धोकवडे, बोरीस, 

                         सारळ, मिळकतखार, आवास, पेढांबे, वैजाळी, मुळे, पेझारी, शहाबाज, शहापूर,

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरुवारी रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहांमध्ये प्रांताधिकारी यशवंत माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या उपस्थितीत व लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सरपंचपदाचे आरक्षण ( ग्रामपंचायत) :

अनुसूचित जाती :  (तिसे, कोलाड),

अनुसूचित जाती महिला : (वाली)

अनुसूचित जमाती : (येरळ, जामगाव, तांबडी, पुगाव, सानेगाव),

अनुसूचित जमाती महिला : (चिंचवलीतर्फे दिवाळी, मढाली खुर्द, भातसई, वाशी, देवकाने)

नागरिकांचा मागास प्रवर्ग : धोंडखारतर्फे बिरवाडी, मेढा, आरे बुद्रुक, वांगणी, महाळुंगे, खांबरे, चिंचवलीतर्फे आतोणे, कुडली

 नागरिकांचा मागास महिला प्रवर्ग : (तळाघर, वावेपोटगे, निडी तर्फे अष्टमी, किल्ला, सारसोली,  शेडसई, भालगाव, ऐनघर, धामणसई)

 सर्वसाधारण : (खारगाव, भिसे, दापोली, रोठबुद्रुक, वरसगाव, विरझोली, पाटणसई, वणी,न्हावे, चणेरा, गोवे, खैरेखुर्द, वरसे, शेणवई, धाटाव, तळवली तर्फे अष्टमी, पिंगळसई)

सर्वसाधारण महिला :  नागोठणे, आंबेवाडी, पळस, संभे, कडसुरे, कोंडगाव, रोठखुर्द, पिंगोडा, नेहरूनगर, पहुर, ऐनवहाळ, मालसई, पुई, खांब, वरवठणे, घोसाळे, कोकबन

नागोठणे विभागातील चारही ग्रामपंचायतींवर महिलाराज

नागोठणे : प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी रोहे येथे जाहीर करण्यात आले. नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे आणि ऐनघर या चार ग्रामपंचायतींचासुद्धा त्यात समावेश होता. या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिलांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे या पदावर डोळा ठेवून बसलेल्या अनेक इच्छुक सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले असून काहीजणांनी आता उपसरपंच कसे होता येईल, याची आकडेमोड करायला सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

ग्रामपंचायत आणि सरपंचपदाचे आरक्षण 

1) पळस : सर्वसाधारण महिला

2) कोंडगाव : सर्वसाधारण महिला

3) वरवठणे : सर्वसाधारण महिला 4) ऐनघर  : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply