Breaking News

टीम इंडियाच्या यशाचे श्रेय घेण्यास द्रविडचा नकार

बंगळुरू : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी तयार करणारा द्रविड या विजयाचा मानकरी असल्याचे अनेकांनी म्हटल आहे. द्रविडने मात्र ऑस्ट्रेलियातील यशासाठी कारण नसताना मला श्रेय दिले जात आहे, असे मत व्यक्त केले आहे.
एका वृत्तसमूहाशी बोलताना द्रविडला ऑस्ट्रेलियातील विजयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता, त्याने हसत या विजयाचे श्रेय घेण्यास नकार दिला. हे श्रेय उगाच मला दिले जात आहे. सर्व तरुण खेळाडूंनी कौतुकास्पद खेळ केला, असे द्रविड म्हणाला.
द्रविडने श्रेय नाकारले असले तरी ऋषभ पंत, हनुमा विहारी, शुभमन गिलसारख्या अनेक खेळाडूंनी आमच्या यशामध्ये द्रविडचा वाटा आहे, असे अनेकदा म्हटले आहे.
भारतीय संघाच्या दौर्‍याआधी भारतीय संघाचा स्पोर्टींग स्टाफ, भारत अ आणि 19 वर्षांखालील संघ, निवड समिती सदस्यांसोबत राहुल द्रविड चर्चा करतो आणि कोणत्या खेळाडूंकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे या संदर्भातील सल्लेही देतो. भारतीय अ संघामध्ये कोणाचीही निवड करताना तो रणजीमध्ये कसा खेळला हे पाहिले जाते. भारतीय अ संघाकडे द्रविडसारखा प्रशिक्षक असेल तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल, असे मत निवड समितीचे माजी सदस्य जतिन परांजपे यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply