पनवेल : रामप्रहर वृत्त : रोहिंजन, ता. पनवेल येथे गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने वेशी आई व श्री सत्यनारायणाची महापूजा व आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटावे यासाठी रोहिंजन गावात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गजानन प्रासादिक भजन मंडळ रोहिंजन बुवा विजय बंडुशेठ पाटील, अर्जुन पाटील, मीराताई हरियाणा यांचे प्रवचन, रखुमाई महिला मंडळ हरिपाठ, सुकापूर संगीत अभंगवाणी व युवा कीर्तनकार आरतीताई महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसवेक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक संतोष भोईर, अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, चाहूशेठ पाटील, नंदकुमार म्हात्रे, भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत नवी मुंबई युवा संस्था अध्यक्ष प्रशांत गायकर, श्रीपत पाटील, रवींद्र पाटील, अंकुश पाटील, पांडुरंग पाटील, सुनित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …