Breaking News

लेणी संवर्धनासाठी विद्यार्थी सरसावले; कोंडी धनगरवाडी शाळेची नेणवली परिसरात स्वच्छता मोहीम

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेणी परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेण्यांची माहिती घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. प्राचीन व सांस्कृतिक ठेव्याची माहिती मुलांना व्हावी व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. सर्वांनी मिळून लेणी, सभागृह, स्तूप व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. त्यानंतर राजेंद्र खैरे यांनी मुलांना लेण्यांची माहिती दिली व त्यांच्या संवर्धनाचे महत्व सांगितले. त्यानंतर एकत्र जेवणदेखील केले. पुन्हा एकदा परिसर स्वच्छ करून शाळेत परतले.

प्राचीन नेणवली लेणी

खडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेणी आहेत. या लेणी समूहात 21 लेण्या आहेत. लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस उंच व मोठा घुमट आहे. त्याचा व्यास 1.5 मीटर, उंची 3.5 मीटर आहे. घुमटाच्या मध्यभागी झाकणासारखा आकार असून त्यात चौरसाकृती छिद्र आहे. या लेण्यातील सभागृहाचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. हे सभागृह 21 मीटर बाय 16 मीटर आहे. सभागृहाच्या डाव्या बाजूस व मागील भिंतीत एकूण 17 खोल्या आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply