Breaking News

तळोजात वाहतूक नियमांबाबत जनजागृती

पनवेल : वार्ताहर

तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे दोन अधिकारी, 40 जवान, तळोजा शाखेकडील दोन अधिकारी 12 कर्मचारी यांनी वाहतूक नियमांची जनजागृती केली.

रॅपिड ऍक्शन फोर्स कॉलनी, चौक या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढून तळोजा फेज वन, तळोजा फेज 2, घोटगाव घोट कॅम्प, आयजीपीएल नाका, एमआयडीसी रोड, नावडे, तळोजा गाव या भागातून रॅलीने जाऊन मोटरसायकल चालकांनी हेल्मेट वापरणे, वाहतुकीचे नियम पाळणे या विषयी पोस्टर व मेगा फोनद्वारे आवाहन करण्यात आले.

ह्या रॅलीत पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुरुषोत्तम कराड व सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सावंत व रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे असिस्टंट कमांडर संजय चोहान तसेच त्यांचे सहकारी, तळोजा शाखेचे अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून एक पाऊल अपघातमुक्त समाज व अपघातमुक्त शहर निर्मिती करण्यासाठी टाकावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply