Breaking News

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत रहिवाशांना माहिती

नगरसेविका सुशिला घरत यांची उपस्थिती

पनवेल : वार्ताहर

पंचशील नगर सामाजिक संस्था मार्फत भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसनबाबत ज्या दोन योजना आहे त्या योजनांची माहिती झोपडपट्टीत राहणार्‍या नागरिकांना देण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका नगरसेविका सुशिला घरत, सामाजिक करार्यकर्ते जगदिश घरत उपस्थित होते.

पंचशील नगर सामाजिक संस्था अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रथम प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारकडून असून या योजनेंतर्गत नागरिकांना दोन लाख 65 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. उर्वरित रक्कम ही झोपडीधारकाला बँकचे लोन काढून दिली जाईल. या योजनेंतर्गत बँक लोनबाबत थोड्या अडचणी आहे त्या दूर होतीलच नंतर ही योजना लागू होऊ शकते. दुसरी म्हणजे एसआरए योजना ही झोपडपट्टी प्राधिकार अंतर्गत असून महाराष्ट्र शासनाची आहे. या योजनेत 25 टक्क्यांपर्यंत रक्कम भरावी लागते. बाकी शासन भरते. या योजना फायद्याच्या असली तरी जेव्हा ते झोपडपट्टी भागात सर्रास पुनर्वसन झाले, तर सर्वसामान्य लोकांच्या फायदेशीर ठरू शकते. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी करून जी चांगली व फायदेशीर तसेच लोकांवरती कर्जाचा बोझा चढणार नाही, अशा योजनेची अंमलबजावणी नेत्यांनी करून पनवेल परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन काम मार्गी लावावे, अशी जनतेची भावना आहे. या कार्यक्रमादरम्यान अधिक माहिती राष्ट्रीय निवारा परिषद संघटन प्रमुख डी. डी. गायकवाड यांनी दिली.

जगदीश घरत यांनी माहिती जाणून घेतल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसनबाबत नागरिकांच्या जे भल्याचे असेल त्याला आमचा पाठिंबा असेल. त्याच योजनेची आपण मागणी करू, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात नागरिकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे गायकवाड यांनी देऊन सर्वांचे समाधान केले आहे. तसेच पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने जनतेपर्यंत ही माहिती पोचवली असून नागरिकांनी मतभेद विसरून एकत्र येऊन सकारात्मक कामे करावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रम करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, सहखजिनदार कांताबाई वानखेडे, संघटक कैलास नेमाडे, सहसंघटक सुरेखा वायदंडे, सहसदस्य सुरेश पराड, संतोष ढोबळे, हेमा रोड्रिंक्स, अमेय इंगोले, संतोष जाधव, रामदास खरात, शोभा गवई, अजय दुबे, संजय धोत्रे आदींसह नागरिकांचे सहकार्य लाभले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply