कर्जत : बातमीदार
रायगड जिल्हा माहिती कार्यालय आणि कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कलारंगच्या कलाकारांनी कर्जत शहरात जागर आरोग्याचा या पथनाट्यातून जनजागृती केली.कोविडपासून घ्यावयाची काळजी तसेच वर्षभरात शासनाने सुरु केलेल्या नवनविन योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने कलारंगच्या कलाकारांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाने कर्जत शहरातील रेल्वे टेशन, कपालेश्वर मंदिर, आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर, तसेच हालिवली, मोठे वेणगाव, छोटे वेणगाव या ठिकाणी जागर आरोग्याचा हे पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातून माझं कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमाविषयी माहिती देवून मास्कचा वापर, साबणाने स्वच्छ हात धुणे, शाररिक आंतर पाळणे या सवयी समान्य जनतेला पटवून दिल्या. तसेच कोविड काळात राबविलेल्या आरोग्यविषयक योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. कलारंगच्या प्रकल्प वाणी, फरीद अफवारे, योगेश पाटील, सौरभ तांबोळी, आशय चाचड, अर्चना गायकर, मनाली देशमुख, निर्मिती पाटील, सिद्धी नाचरे या कलाकारांनी ही पथनाट्ये सादर केली.