Breaking News

मालमत्ता कर भरता येणार ऑनलाइन

पनवेल : प्रतिनिधी

कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केल्याने नागरिकांना आता ऑनलाइन  मालमत्ता कर भरता येणार आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केले आहे.   कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत जे नागरिक कर भरतील त्यांना पाच टक्के सूट आणि ऑनलाइन कर भरल्यास अतिरिक्त दोन टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी ऑनलाइन कर भरणा भरून एकुण सात टक्के सूट मिळण्याचा फायदा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या पूर्वाश्रमीच्या पनवेल नगरपरिषदेमधील मालमत्ता धारकासांठी सन 2020-2021 वर्षासाठी मालमत्ता कराची रक्कम आता ऑनलाइनही भरता येणार आहे. panvelmc.org  या संकेतस्थळावरवर नागरिकांनी कर भरल्यास त्यांना दोन टक्के अतिरिक्त सूट (शासकीय कर वगळून)  देण्यात येणार आहे. ज्यांना या संकेतस्थळावरून कर भरणे शक्य होणार नाही ते प्रत्यक्ष येऊन कर भरू शकतील.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply