Breaking News

राज्यसभा सदस्य समितीची अलिबागला भेट

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यसभा व उपविधान समिती महाराष्ट्राच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर आली आहे. गुरुवारी (दि. 28) या समितीने अलिबागला भेट दिली. अलिबाग समुद्रकिनारी जल प्रदूषणाबाबत असणार्‍या कायद्याचे पालन प्रशासनाकडून केले जात आहे की नाही, याबाबत  या समितीने पाहणी केली. या वेळी समितीने कुलाबा किल्ल्यालाही भेट दिली.

राज्यसभेच्या बारा खासदारांचा समावेश असलेल्या या समितीचा पाच दिवसांचा हा दौरा असून तो मुंबईपासून सुरू झाला. गुरुवारी समितीने अलिबागला भेट दिली. त्यानंतर ही समिती गोवा राज्यात दोन दिवसांच्या दौर्‍यावर जाणार आहे.

जल प्रदूषणचा कायदा केंद्र सरकरने केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी राज्यातील प्रशासन योग्य पद्धतीने करीत आहेत का, यासाठी खासदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जल प्रदूषणाबाबत माहिती गोळा केली जात आहे.

जल प्रदूषण  कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे का, समुद्राचे प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपययोजना करणे आवश्यक आहे, अधिकारी, प्रशासन यांना काय अडचणी येत आहेत. या बाबतची माहिती समितीमार्फत घेण्यात आली, अशी माहिती खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.

खासदार प्रतापसिग बजवा, वंदना चव्हाण, दुष्यांत चव्हाण, विकास महात्मे, राम विचार नेताम, नरसिंह राव, तिरुची सेवा, विशाल सिंह, अरुण शर्मा, रवींद्र कुमार, बी. के. सिन्हा, विवी एस. खर्‍यात, प्रदीप तामता, विवेक तनखा या बारा खासदारांचा या समितीमध्ये समावेश आहे. समितीच्या अलिबाग भेटीच्यावेळी रायगडचे  जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply