पनवेल : प्रतिनिधी
देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. त्या अनुषंगाने योजना, विकासकामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी (दि. 18) सकाळी 10.30 वाजता उरण विधानसभा क्षेत्राचे संयुक्त मोर्चा संमेलन पनवेलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त मोर्चा संमेलन होणार असून या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, विनोद साबळे आदींची उपस्थिती असणार आहे.
Check Also
आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …