धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरंपच नितीन वारांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रोठ बुद्रुक गावामध्ये वृक्षारोपण व मास्कवाटप करण्यात आले. तसेच तळाघर हायस्कूल येथील गरीब व गरजुंना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमास सरंपच नितीन वारांगे, दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, उपसरपंच वेदीका डाके, सदस्य वैभवी घाग, ग्रामसेविका अलका बामगडे, विलास डाके, राज मुद्रा फाऊंडेशन अध्यक्ष राजेश डाके, राजेश भगत, तुकाराम वारांगे, ग्रामपंचायत कर्मचारी उद्देश वारांगे, निरजंन वारांगे, रितेश घाग, माजी सदस्या श्रद्धा घाग, साळुंखे, शशिकांत हिरामन वाघमारे, विरेंद्र वारांगे, साळुंखे ताई यांसह गावातील महिला तसेच मित्र परिवार उपस्थित होते.