तळवली ः प्रतिनिधी
महाशिवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अलिबाग येथील श्री शिवशंकर ग्रामस्थ मंडळ तळवली (मुंबई) संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. 21) 60 किलो वजनी गटाचे कबड्डी सामने आयोजित केले आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी उपरोक्त संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर गायकर यांनी केले आहे. या स्पर्धेत चार विजयी संघांना बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकाला 15 हजार रुपये रोख आणि करंडक, द्वितीय क्रमांकाला 10 हजार रुपये रोख आणि करंडक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी पाच हजार रुपये रोख आणि करंडक अशी बक्षिसे देण्यात येतील. सामने ठीक 4 वाजता सुरू होतील.