उरण ः वार्ताहर
उरण नगर परिषद हद्दीत नवीन विकास योजनेंतर्गत बांधलेल्या नागाव रोड ते कामठा या रस्त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व पालिका गटनेते रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजू ठाकूर, धनंजय कडवे, नगरसेविका प्रियंका पाटील, जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, स्नेहल कासारे, यास्मिन गॅस, मुख्याधिकारी संतोष माळी, म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना पाटील, उपसरपंच पल्लवी म्हात्रे, नागावचे उपसरपंच भूपेंद्र घरत, ग्रामपंचायत सदस्य राकेश म्हात्रे, अमृता घरत, दीपिका पाटील, विनया ठाकूर, युवा मोर्चा उरण शहर अध्यक्ष निलेश पाटील, हितेश शाह, मकरंद पोद्दार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.