Breaking News

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेल मनपातर्फे विविध कार्यक्रम

पनवेल : प्रतिनिधी

महापालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी (दि. 25) राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने मतदार अधिकार, कर्तव्य व निवडणूक याविषयी जाणीव, जनजागृती निर्माण करण्यासाठी, तसेच लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबधीत प्रतिज्ञा शपथ घेण्याचा कार्यक्रम व नियमितपणे मतदानाचा हक्क बजावणार्‍या युवा व ज्येष्ठ मतदारांचा सन्मान कार्यक्रम पालिका मुख्यालय, कामोठे, खारघर, कळंबोली, पनवेल येथे घेण्यात आला.

सीकेटी महाविद्यालय, दादासाहेब लिमये महाविद्यालय कळंबोली, नवीन पनवेल येथील एनएनएस विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने मार्गदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कामोठे येथील प्रभाग कार्यालयाच्या ‘क’ च्यावतीने चेरोबा मंदिर येथे सभापती अरूणा भगत यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्त्या रंजना सडोलीकर, गृह निर्माण संस्था प्रतिनिधी श्रुती  किर्तने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. किर्ती हंपे, रिक्षा वाला संघटनेचे प्रतिनिधी गोपीनाथ भगत, आरोग्य समन्व्यक प्रतिनिधी गोमेश म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे उपस्थित होते.

कळंबोली प्रभाग कार्यालय ‘ब’ राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त प्रभाग समिती कार्यालयात मतदार शपथ घेण्यात आली. तसेच बूथ निहाय नागरिकांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले. त्याप्रसंगी सभापती प्रमिला पाटील, रवी पाटील, प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, आरोग्य निरीक्षक, सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. खारघर प्रभाग कार्यालय ‘अ’च्या वतीने प्रत्येक चौकामध्ये सफाई कर्मचार्‍याच्या वतीने शपथ घेण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, सभापती संजना कदम, यांच्या उपस्थितीत मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली.

पनवेल प्रभाग कार्यालय ‘ड’मध्ये सर्व कर्मचार्‍यांनी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. दादासाहेब लिमये महाविद्यालय, कळंबोली येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण उपायुक्त विठ्ठल डाके, प्राचार्य सुधाकर लघू पचांग, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply