Breaking News

शतकवीर जॉनी बेयरस्टोचा गावसकरांवर निशाणा

पुणे ः प्रतिनिधी
इंग्लंडचा ओपनर जॉनी बेयरस्टोने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गावसकरांनी टेस्ट सीरिजदरम्यान बेयरस्टोच्या इच्छाशक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर बेयरस्टोने प्रतिक्रिया दिली. गावसकर मला फोन करून टेस्ट क्रिकेट खेळण्याबाबतच्या माझ्या इच्छाशक्तीबाबत चर्चा करू शकतात, असे बेयरस्टो म्हणाला.
भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या चार इनिंगमध्ये बेयरस्टो तीन वेळा शून्यावर आऊट झाला होता, तर एका इनिंगमध्ये त्याला 28 रन्स करता आले. इंग्लंडचा या सीरिजमध्ये 3-1ने पराभव झाला होता. बेयरस्टोची बॅटिंग बघून त्याला टेस्ट क्रिकेट खेळण्याची इच्छा दिसत नसल्याची टीका या वेळी झाली होती.
भारत-इंग्लंडमधील दुसर्‍या वन डेनंतर बेयरस्टोला गावसकरांच्या या टीकेबाबत विचारण्यात आले, तेव्हा बेयरस्टोने गावसकरांनी आपल्याला फोन करून यावर चर्चा करावी, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. दुसर्‍या वन डेमध्ये बेयरस्टोने 112 बॉल्समध्ये 124 रन्सची खेळी केली. त्यामुळे भारताने दिलेल्या 337 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 39 बॉल आणि 6 विकेट्स राखून केला.
टेस्ट सीरिजच्या शेवटच्या मॅचच्या दुसर्‍या इनिंगमध्ये अश्विनच्या बॉलिंगवर बेयरस्टो आऊट झाला. तेव्हा तो खेळपट्टीवर राहण्यासाठी इच्छुक दिसत नाही, असे मत गावसकरांनी मांडले होते, पण गावसकरांचे हे वक्तव्य आपण ऐकले नसल्याचे बेयरस्टो म्हणाला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply