खोपोली : प्रतिनिधी
शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. सर्वानी महात्मा फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा अभ्यास करून आदर्श घ्यावा, त्यांनी ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये शिक्षणाची जागृती केली त्याप्रमाणे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कुठलीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 11) खोपोली नगर परिषद कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गणेश शेटे बोलत होते. नगराध्यक्षा सुमन औसरमल, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक मोहन औसरमल, अमोल जाधव, नगरसेविका केविना गायकवाड, निकिता पवार, अपर्णा मोरे, सुनीता गायकवाड, बाळू पिंगळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक या वेळी उपस्थित होते.
प्रारंभी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प वाहून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले.