Breaking News

नेरळमधील मोठा रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील नेरळ शहरात कोरोना संक्रमीत रुग्ण सापडल्याने येथील काही रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यास व या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे हे आदेश पुढील 28 दिवस लागू राहणार आहेत. कर्जत तालुक्यातील दुसरे मोठे शहर असलेल्या नेरळमधील पायरमाळ, राजेंद्रगुरु नगर येथे जास्त प्रमाणात कोरोना संक्रमीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पायरमाळ येथील  समीर गुरव यांचे घर ते श्रीकांत रावल यांच्या घरापर्यंत, नंदू घुडे ते सुधाकर देसाई यांच्या घरापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेरळ माथेरान रेसिडेन्सी इमारत, सुधाकर देसाई यांचे घर ते सुशील नाडर यांच्या घरापर्यंत, मोहचीवाडी भाग. त्यासोबत राजेंद्रगुरु नगर येथील निलांबरी अपार्टमेंट ते राजिप शाळा, श्रीकृष्णधाम ते साई तुलसी इमारत, घोडविंदे यांचे घर ते धारप सभागृह, छोटू गॅरेज ते नाकोडा इमारत हे भाग कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे  कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना येथून बाहेर जाण्यास तसेच बाहेरच्या नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे आदेश शेवटचा रुग्ण बरा झाल्यापासून 28 दिवस लागू असतील, असे आदेश कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिले आहेत. आदेश प्राप्त होताच नेरळ ग्रामपंचायतीकडून तात्काळ हे क्षेत्रे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply