अनावश्यक फिरणार्या वाहनांवर कारवाई
पेण : प्रतिनिधी
लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही अनावश्यक फिरणार्या वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पेणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, तेथे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पेण व वडखळ पोलिसांनी कडक नाकाबंदी केली आली आहे. पेण शहरातील नगरपालिका कार्यालय चौक, रायगड बाजार तसेच शहराच्या सर्व प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच वडखळ येथे अलिबागफाटा येथे विनाकारण मोटारसायकल, चारचाकी वाहने घेऊन फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौरीशंकर हिरेमठ, सहाय्यक निरीक्षक संतोष पिपळे, उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार कलींदर तडवी, वडखळचे पोलीस निरिक्षक बाळा कुंभार यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली. पेण शहर व वडखळ येथील अत्यवश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे महामार्गावरून फिरणार्या वाहनांची तपासणी करून विनाकारण फिरणार्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.