Breaking News

मुरूड व्यापारी असोसिशनकडून अपघातग्रस्त युवकाला आर्थिक मदत

मुरूड : प्रतिनिधी

अपघातात जखमी झालेल्या माथाडी कामगाराला वैद्यकीय उपचारासाठी मुरूड व्यापारी असोसिएशनने आर्थिक मदत केली आहे. मुरूड व्यापारी असोसिएशनमध्ये 200 सदस्य आहेत. 50 वर्षे जुनी असलेली ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असते. मुरूड भांडारवाडा येथील रुक्षन भोसले हे गेली अनेक वर्षे येथील बाजारपेठेत हमालीचे काम करतात. अंगावर कपाट पडल्याने त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. मुरूड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आंबुर्ले तसेच संदीप पाटील, सुरेश जैन, अशोक धुमाळ, पिंटू शहा, महेश भगत, भावेश शहा, सागर चौलकर आदि पदाधिकार्‍यांनी रुक्षन भोसले यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांकडे 30 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply