पनवेल : रामप्रहर वृत्त
माणुसकी ज्यांच्या रक्तातच आहे असे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे गोरगरीब, दिव्यांग, सर्वसामान्य, वंचित वर्गाविषयी सहानुभुती व आपलेपणा असणारे मानवतावादी राजकारणी व उद्योगपती आहेत, असे उद्गार अपंग क्रांती संघटना व अपंग उत्कर्ष सामाजिक सस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी काढले. कोरोना काळात दिव्यांग कुटुंबांना आर्थिक निधी, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व अन्नदान लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने केले व आज सुध्दा करीत आहेत. पैसा आणि संपत्ती सगळेच कमवितात, परंतू गरीब, गरजू, दिव्यांगांसाठी नियमितपणे मदत करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखी माणसे फारच दुर्मिळ. आम्ही अनेकवेळा दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटायला गेलो तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन समस्याही सोडविल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्य मिळावे अशा शुभेच्छा देत आहोत तसेच त्यांच्या या मानवतावादी कार्याचे अभिनंदन करीत आहोत, असे बी. जी. पाटील यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळाराम रोडपालकर, विभाग प्रमुख विनोद देवकर (कळंबोली), दत्तात्रेय पाटील (तळोजा), विकास ठाकूर (नावडे रोडपाली), अतूल रायबोले (खांदा कॉलनी), उज्ज्वला नलावडे (नवीन पनवेल), रोशन एंजल (कामोठे), प्रकाश देसाई (खारघर), कुलदीप तांबे (पनवेल) या सर्वांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या.
яндекс