
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखीनच वाढणार आहे. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशावेळी वाकडी येथील हिंदुस्थान नगरमधील शेतकरी कामगार पक्षाचे युवा पक्ष प्रचारक नितेश थळे, उत्तम पाटील, धर्मेश उलवेकर, सुभाष टेंभुर्णे, एकनाथ परब आणि किशोर आधारे यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी पनवेल पंचायत समिती सभापती भूपेंद्र पाटील, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, जनार्दन पाटील, अॅड. अरुण पाटील, संदीप पाटील, शशिकांत खुटले, मंगेश पाटील आदी उपस्थित होते.