मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधी सदस्यपदाच्या पोटनिवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी फक्त नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मुरुड तालुक्यातील राजपुरी (3 सदस्य), एकदरा (8 सदस्य), सावली, वावडुंगी, चोरडे, आणि नांदगाव (प्रत्येकी एक सदस्य) या सहा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यापैकी नादगांव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4 मधून यशोदा हरिश्चंद्र वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद माळी यांच्याकडे सादर आहे केला.
या उमेदवारी अर्जाची छाननी 22़नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता मुरुड तहसीलदार कार्यालयात होणार आहे.