Breaking News

पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त

पनवेल : वार्ताहर

प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केल्यामुळे व तत्काळ उपचार घेतल्यामुळे पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे पनवेलसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग पनवेलसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात अनेकांचा मृत्युदेखील झाला. कोरोनाची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने प्रभावीपणे गाव पातळीवर राबविल्याने पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. पनवेल तालुक्यातील वलप, शिवकर, पारगाव-डुंगी, मालडुंगे, देहरंग, धोदाणी, धामणी, दिघाटी, बारवई, घेरा किल्ला या गावांत सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. पनवेल महानगरपालिका हद्द आणि पनवेल ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने कोरोनारुग्ण सापडत आहेत. पहिल्या लाटेत ग्रामीण भागांत कमी प्रमाणात रुग्ण सापडून येत होते, मात्र दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पनवेल परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली, मात्र ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होत नव्हते. अत्यावश्यक काम नसताना देखील नागरिक बाहेर फिरत असत. अखेर ग्रामीण भागांतील कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि नागरिकाना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती केली. तसेच कोरोना टेस्ट वाढविल्या. प्रशासनाने विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली. सापडून येणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरीदेखील कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनामुक्त गावे

वलप, शिवकर, मालडुंगे, पारगाव-डुंगी, देहरंग, धोदाणी, धामणी, दिघाटी, बारवई, घेरा किल्ला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply