Breaking News

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासा; रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबई शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी 1208 दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची पहिली लाट जानेवारी महिन्यात कमी होत रुग्णदुपटीचा काळ 735 दिवसांवर गेला होता, मात्र मार्चपासून शहरात पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत संसर्ग झपाट्याने पसरला होता. त्यामुळे शहरात रुग्णवाढ मोठी होती. एप्रिलमध्ये तर कोरोनाकाळातील सर्व उच्चांक रुग्णसंख्येने मोडले गेले. दैनंदिन रुग्णसंख्या ही एक हजारांपर्यंत गेली होती. त्यामुळे शहराचा धोका वाढला होता. रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. त्यानंतर शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंध व पालिका प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे या संकटातून शहर बाहेर पडले आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्या ही 50 पर्यंत स्थिर आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळही वाढला आहे. सध्या हा कालावधी 1208 दिवस म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. हा मोठा दिलासा शहराला मिळाला आहे. सोमवारपासून शहरातील रुग्णस्थिती आटोक्यात आल्याने निर्बंध उठविण्यात आले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. यामुळे काही प्रमाणात रुग्णवाढ होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत अद्याप रुग्णसंख्या स्थिर आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेचे संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला असून ही शहरासाठी समाधानकारक बाब असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply