लोणावळा ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनदेखील नागरिक गर्दी करीतच असल्याने शुक्रवार (दि. 16)पासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे पोलिसांनी म्हटले आहे.